१० जीबी रॅम असलेला पहिला स्मार्टफोन लवकरच बाजारात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्मार्टफोनच्या विकत घेत असताना त्याची रॅम , मेमरी आणि लुक या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात . यामध्ये आतापर्यंत १ जिबी रॅम पासून वाढ होत ६ जिबी पर्यंत मोबाइल बाजारात सहज उपलब्ध होत होते. आता ओप्पो कंपनीने मात्र सर्वांना चकित करत १० जिबी रॅमचा मोबाइल बाजारात आणला आहे.

ओप्पो कंपनीच्या एका कार्यक्रमामध्ये १० जीबी रॅम असलेल्या R17 या स्मार्टफोनची झलक पहायला मिळाली. चीनमधील सोशल नेटवर्किंग वेबसाईट Weibo वर एका इव्हेंटचे काही फोटो शेअर झाले आहेत. विशेष म्हणजे ओप्पो कंपनीतून बाहेर काढण्यात आलेल्या एका प्रोग्रामरने हे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये आर १७ या स्मार्टफोनचा देखील फोटो होता. कंपनीने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही. PlayfulDroid वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच १७ नवे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’635154e7-93dd-11e8-ad05-abd7d46aa45a’]
ओप्पोने मार्च महिन्यातच आर १५ हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनचे अपग्रेड व्हर्जन आर १७ असेल असे सूत्रांकडून कळते. जर ओप्पोने हा फोन बाजारात आणला तर तो १० जीबी रॅम असलेला पहिला स्मार्टफोन ठरणार आहे .

ओप्पो शिवाय व्हीवो देखील Xplay 7 जीबीचा रॅम असलेला स्मार्टफोन आणण्याची शक्यता आहे. व्हीवो Xplay7 मध्ये 4K OLED स्क्रीन असणार आहे. यात २५६ जीबी स्टोअरेज आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असेल. या फोनच्या किमतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.