हातगाडी चालकाच्या खून प्रकरणात चौघांना अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – हातगाडी लावण्याच्या कारणावरुन येरवडा येथे संदिप उर्फ आण्णा सुभाष देवकर (रा. नवी खडकी) याचा धारदार शस्त्राने वार करुन आणि गोळ्या घालून खून करण्यात आला होता. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वॉर्ड ऑफिसच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घडली होती. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

गणेश शांताराम चौगुले उर्फ बोरकर, विशाल नागनाथ कांबळे (वय-२२ रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित प्रकाश कोळी (वय-२६ रा. गणराया मित्र मंडळाजवळ, येरवडा), मयुर सुनिल सुर्यवंशी (वय-२८ रा. रविवार पेठ, अग्रेसन भवन जवळ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नवी खडकी येथील नटराज हॉटेल येथे हातगाडी लावण्याच्या कारणावरुन खून करण्यात आला होता. खून करण्यापूर्वी गणेश बोरकर याचा मित्र जावेद सैय्यद याने मयत संदिप देवकर याला हातगाडी लावण्यावरुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी आरोपींनी वॉर्ड ऑफिसच्या आवारातील पाण्याच्या टाकीजवळ संदिप देवकर याच्या डोक्यात फरशी घालून धारदार शस्त्राने वार केले. तर आरोपीपैकी एकाने संदिप देवकर याच्या गोळ्या झाडल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या गुन्ह्यातील आरोपी बोरकर हा पुणे स्टेशन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी आरोपीला पुणे स्टेशन येथून सापळा रचून अटक केल. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा साथिदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक केली.

ही कारवाई पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किरण बलवडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस उप निरीक्षक रविद्र गवारी, सहायक पोलीस फौजदार बाळु बहिरट, पोलीस हवालदार अजिज बेग, हणमंत जाधव, संदिप मांजुळकर, पोलीस नाईक सचिन रनदिवे, मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, पंकज मुसळे, सचिन पाटील, सुनिल सकट, विष्णु सरवदे, सुनिल नागलोत, समीर भोरडे, अजय पाडोळे, राहुल परदेशी, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.