नरम गरम

देव आनंद यांची अधुरी प्रेमकहाणी…

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

बॉलीवूडचे एव्हरग्रीन अभिनेते देव आनंद यांची आज जयंती आहे. पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या देव आनंद यांचं मूळ नाव ‘देवदत्त पिशोरीमल आनंद’ असं होतं. देव आनंद यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९४६ मध्ये ‘हम एक हैं’ या सिनेमातून केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d153083-c185-11e8-ac10-fb5bff1175eb’]

देव आनंद यांची प्रेमकहाणी

त्या काळात अनेक तरुणींच्या मनातील हिरो म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेता देव आनंद यांची  प्रेमकहाणी मात्र अधुरीच राहिली. देव आनंद यांची चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान  सुरैया यांच्याशी ओळख झाली. सुरैया तेव्हा मोठ्या स्टार होत्या आणि देव आनंद चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते.

१९४८ मध्ये आलेल्या ‘विद्या’ या सिनेमात सुरैय्या आणि देव आनंद यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर ही जोडी अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसली. दिवसेंदिवस यांच्यातील प्रेम अधिकच फुलत गेले. सुरैय्याबरोबरच्या प्रेमसंबंधांचा खुलासा देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमांसिंग विथ लाईफ’ या आत्मकथेत केला आहे.
[amazon_link asins=’B077B3MXKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’446fab0a-c185-11e8-943a-2735226670d3′]

त्यात त्यांनी लिहले आहे की कामादरम्यान आमची मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्ही तासन् तास गप्पा मारत असत. सुरैया यांच्या आजीचा या सगळ्याला विरोध होता.  सुरैय्या यांचे जरी देव आनंद यांच्यावर  प्रेम असले तरी त्यांना आजीच्या विरोधात जायचे नव्हते. देव आनंद  हिंदू होते आणि सुरैया मुस्लिम त्यामुळे या लग्नाला विरोध झाला.

देव आनंद यांनी सुरैयाकरता साखरपुड्याची अंगठी घेतली. ती अंगठी देण्यासाठी गेले होते  तेव्हा सुरैया यांनी ती समुद्रात फेकली. देव आनंद यांनी सुरैया यांना त्याबद्दल कधीच विचारलं नाही.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a26fc19-c185-11e8-9334-a37adeb0e1bd’]

या घटनेनंतर  देव आनंद आणि सुरैया यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.  सुरैय्यापासून वेगळे झाल्यानंतर देव आनंद यांनी  लग्न करुन संसार थाटला पण सुरैय्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या होत्या.  त्या देव आनंद यांच्या प्रेमाला कधीच विसरल्या नाहीत. सुरैय्या आणि देव आनंद यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली.

खाकी वर्दीतील माणुसकी; ३ वर्षाचा बहुमिक सुखरूप

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

one × four =