न्यायालयात उलटतपासणी घेतल्याने वकीलावर प्राणघातक हल्ला

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील न्यायालयाच्या आवारात ॲड. दिनेश डी.पाटील यांना आरोपीतर्फे उलटतपास घेत असतांना प्रश्न विचारल्याचा राग आल्याने फिर्यादी, साक्षीदार व इतर लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याने अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने देखील विनयभंगचा व मारहाण केल्याचा गुन्हा ॲड दिनेश पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

ॲड.दिनेश डि. पाटील हे कुलकर्णी यांचे न्यायालयात आर सी सी नंबर २२/२०१८ होती. व त्या गुन्हामधील फिर्यादी सिमा शरद पाटील व सदर केस मधील आरोपी शरद नारायण पाटील वगैरे यांच्यावतीने कामकाज पाहत होतो. सदरची केसचा पुकारा १२.३० वाजता झाला. तेव्हा न्यायालयातील कक्षात सिमा शरद पाटील हिचा जबाब झाल्यानंतर मी तिची उलट तपासणी घेतली. त्यात मी फिर्यादी यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्याचा राग आला होता व साक्ष आटोपल्यानंतर न्यायालयाचे कुक्षातुन बाहेर आले. त्यावेळी तिथे सिमा शरद पाटील (रा. विद्याविहार कॉलनी अमळनेर) व विजय अमृत पाटील (रा लोंढवे ता अमळनेर) हे तेथे आले व न्यायकक्षेत हुज्जत घालू लागले.

त्यावेळी ॲड. यज्ञेश्वर,प्रशांत संदानशिव अशांनी त्यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते दोघे शिवीगाळ करुन अरेरावीची भाषा करुन बाहेर निघुन गेले. त्यांनतर श्री कलकर्णी यांचे न्यायकक्षेत जावून सदर घटनेबाबत त्यांना माहीती दिली. त्यावेळी त्यांनी कोर्ट केस वॉच विनोद धनगर यांना बोलावून त्यादोघांना समज देण्याविषीयी सांगुन कोर्टच्या बाहेर जाण्याचे सांगितले.

ते कोर्ट बाहेर गेल्यानंतर इतर वकिल बांधवासोबत वकिल कक्षेत जाऊन त्यांना धुळे येथे काम असल्याने ते धुळे जाण्यासाठी दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास कोर्ट आवारात लावलेल्या त्यांच्या कार मध्ये बॅग ठेवत कारचा दरवाजा उघडत असतांना सिमा पाटील व विजय अमृत पाटील व इतर लोक तेथे आले व त्यांनी शिवीगाळ करत ॲड.दिनेश पाटील यांना ओढले व त्यावेळेस विजय अमृत पाटील याने लाथाबुक्कांनी मारहाण केली.

त्यानंतर न्यायालयाचे आवारात लावलेल्या झाडाच्या जवळील लाकडी काठी काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारणार करणार तोच डावा हात वर करुन काठीचा वार वाचविला. त्यावेळी डाव्या हाताचे कोपऱ्या जवळील हाडावर मार लागला व विजय अमृत पाटील याने गळ्यातील सोन्याची १५ ग्रम वजनाची चैन हि खेचुन घेतली. त्यावेळेस हजर असलेले ॲड यज्ञेश्वर पांडुरंग पाटील, प्रशांत संदानशिव ,ॲड विनायक वाघ ,ॲड मयुर अफुवाले, ॲड. जगदिश बड्गुजर अशांनी त्यांना त्यांचे तावडीतुन सोडले.

कायद्याचं बोलणाऱ्या तुकाराम मुंडेंना नाशिक महापालिकेने शिकवला ‘हा’ नियम