पिंपरी चिंचवड शहरात लहान मुली होतायत ‘सॉफ्ट टार्गेट’

चालू वर्षभरात ११९ गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

अमोल येलमार

 

हिंजवडी येथील सामूहिक लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य आणि पीडित मुलीचा मृत्यू प्रकरण ताजे असताना पिंपरी येथे सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून, वर्ग शिक्षकाकडून अत्याचार याच बरोबर शहरात बाल लेंगिक अत्याचार सुरू असतानाच आज तर चक्क तडीपार गुंडाने चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी प्रकरणातील निष्काळजीपणा, विनयभंग झालेल्या तरुणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ, आठ दिवस होऊनही त्या मुलीचा आरोपी मोकाट आणि पोलिसांच्या नाकावर ठिचून शहरात फिरणारे तडीपार गुंड आणि त्यांचे कारनामे यावरून शहरात कायदा सुव्यवस्था आहे का नाही?, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे का? आणि तपासी यंत्रणा बिनकामी झाल्या आहेत का? असे अनेक प्रश्न समोर उपस्थित होत आहेत. तर आयुक्तलयाच्या चालू वर्षात तब्बल ११९ बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2370a482-c6f2-11e8-a769-bde38d7290a8′]

जगाच्या पाठीवर नावलौकिक असलेल्या हिंजवडी आयटी पार्क सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हादरून गेले. २०१० मध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर तडीपारीची कारवाई रद्द झालेल्या एका सराईत गुन्हेगार कॅब चालकाने नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यामुळे आयटी पार्क पुरते हादरून गेले होते. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली होती. यानंतर पुन्हा २०१८ मधील सप्टेंबर महिन्यात आयटी पार्क सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले. दोन बारा वर्षाच्या मुलीवर चार तरुणांनी लैंगिक अत्याचार केले. यातील एका मुलीवर अनैसर्गिक कृत्य केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा गंभीर प्रकार मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसानंतर पोलीस ठाण्यात नोंद झाला.

हा प्रकार ताजा असतानाच आयटी कंपनीत काम करणाऱ्या आणि हिंजवडी परिसरातील एका ‘पीजी’मध्ये राहण्यास असलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. पीडित तरुणी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेली असताना तिला चार तास थांबवून ठेवले व तक्रार घेतली नाही. वरिष्ठांच्या सांगण्यावरून ही तक्रार घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे हिंजवडी पोलिसांचे पितळ पोलीस आयुक्तांनी उघडे केले.

[amazon_link asins=’B0741G9HVS,B072XTXF8S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b2b1964-c6f2-11e8-b9b0-29daaf03e666′]

यानंतर एका जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षकानेच विद्यार्थीचा विनयभंग केल्याचे तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आले. तशी नोंद पोलीस ठाण्यात झाली. हे सर्व प्रकार ताजे असतानाच पिंपरी येथून सात वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले. गुन्हा दाखल असूनही स्थानिक पोलीस किंवा नव्याने नियुक्त झालेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुलगी सापडली नाही. तीन दिवसानंतर त्या मुलीचा पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मृतदेह आढळला. तिचा खून केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे याचे सीसीटीव्ही फुटेज असताना देखील अद्याप आरोपी मिळाला नाही. आठ दिवस झाले तरी स्थानिक पोलीस किंवा गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

[amazon_link asins=’B00JJIDBIC,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f77c7df-c6f4-11e8-b9cd-5d165fa1e18d’]

चिंचवडच्या हद्दीत तर पोलिसांच्या नाकावर ठिचून तडीपार गुन्हेगार हद्दीत फिरत असल्याचे स्पष्ट झाले. याच तडीपार गुंडाने शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. रेल्वे स्टेशनच्या बाजूला घेऊन जाऊन भुताची भीती दाखवत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर उच्चप्पा लिंगप्पा मंगळूर (२३) या तडीपार गुंडास अटक केली आहे. यापूर्वीही तो तडीपार असताना शहरात वावरताना आढळून आला होता. तडीपात गुंड शहरात राजरोसपणे वावरत असताना स्थानिक पोलिसांना माहितीही नसणे म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी घटना आहे. तडीपार गुन्हेगार शहरात येऊन लहान मुलींवर अत्याचार करणे ही धक्कादायक घटना आहे. शहरातील महिला, विशेषतः लहान मुली खरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडला आहे. पोलिसांचा गुन्हेगार वचक राहिला नसल्याने खुलेआम सराईत गुन्हेगार हद्दीत फिरत असून गंभीर गुन्हे करत आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गुन्हेगारी वाढू पाहत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहूण ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पिंपरी पोलीस ठाण्यात चालू वर्षात बाल लैंगिक अत्याचाराचे १३ गुन्हे दाखल आहेत, तर चिंचवड पोलीस ठाण्यात ०४, निगडीत१९, भोसरीत ११, एमआयडीसीत ०८, वाकड मध्ये १०, हिंजवडीत ०८, सांगवीत १५, देहूरोडमध्ये १२, तळेगावमध्ये ०५, एमआयडीसी तळेगाव येथे ०१, चाकणमध्ये ०५, आळंदीत ०६ तर दिघी पोलीस ठाण्यात ०२ बाल लैंगिक अत्याचार, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fef0c54b-c6f1-11e8-91ff-b537d71d0f10′]