ताज्या बातम्या

पुणे बार असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विविध मागण्यांसाठी पुणे बार असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार राज्यात सोमवारी वकिलांनी आंदोलन केले.

देशातील प्रत्येक न्यायालयात बार असोसिएशन करता स्वतंत्र इमारत, वकिलांना बसण्यासाठी जागा, स्वच्छतागृहांची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वकील आणि पक्षकार यांच्या कल्याणकारी योजनेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, नवोदित वकिलांना पहिले पाच वर्ष दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, वकिलांच्या निवासस्थानाकरिता कमी मोबदल्यात जागा उपलब्ध करून द्यावी, लीगल सर्विसेस अथोरिटी अॅक्ट मध्ये सुधारणा कराव्या अशा विविध मागण्या बार कौन्सिल आँफ इंडिया ने केल्या आहेत. यामागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

सोमवारी जिल्हा न्यायालयातील अशोका सभागृहात असोसिएशन तर्फे सभा आयोजित केल्या करण्यात आली होती या सभेत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि काही ज्येष्ठ होती लागली आपल्या भावना व्यक्त केले यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत अगस्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी हर्षद निंबाळकर सुभाष पवार राजेंद्र उमाप मिलिंद पवार शिरीष शिंदे आधी वकील आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. यात विविध जिल्ह्यातील वकील संघटनांचे पदाधिकारी आणि वकील वर्ग उपस्थित राहणार आहे. सर्व वकील आझाद मैदानावर जमणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतील.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या