नरेंद्र मोदींना बळ देणारे खासदारच निवडून आणू – पंकजा मुंडे 

औरंगाबाद ; पोलीसनामा ऑनलाईन – “लोकसभेची आचार सहिंता सुरु व्हायला 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचवल्या पाहिजे. औरंगाबाद मध्ये लोकसभेच्या जागेवर पक्षातील उमेदवारांस निवडणू आणू असे सांगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शक्‍ती बुथ प्रमुखांनी मेरा बुथ, पक्ष मजबूत चा नारा देत हे काम करावे असे बुधवारी औरंगाबादकरांना आवाहन केले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पर्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा देत काम सुरु केले आहे. याच संदर्भात बुधवारी औरंगाबादेत भानुदास चव्हाण सभागृहात भाजपच्या लोकसभा शक्‍ती केंद्र प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये शहरातील तीन्ही मतदारसंघातील शक्‍ती बुथ प्रमुख ग्रामीण भागातील बुथ प्रमुखांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांच्याकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या चार जिल्ह्याचे लोकसभाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी ही बैठक घेतली. पंकजा मुंडे म्हणाले, औरंगाबादच्या विधानसभा क्षेत्रात तिन्ही मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच नाही. यामुळे त्यांच्याशी स्पर्धा नाही, असे म्हणत प्रत्यक्ष रित्या मुकाबला शिवसेनेशी करावा लागेल असा इशारा ही त्यांनी दिला.

जी कॉंग्रेस सदैव सत्तेत राहिली आज ते भाजपला थांबविण्याचे प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उत्तम योजना राबविल्या आहेत. त्या लोकांना सांगणे गरजचे आहे. मराठवाड्यात दोन खासदार आहे. आपल्याला औरंगाबाद आणि उस्मानाबादेसाठी चांगली स्थिती आहे. मध्यप्रदेश राज्यस्थान, छत्तीसगढ या राज्याच्या निवडणूकाच्या बाबतील विरोधकांनी चर्चा केली तरी इंथ खात उघडू द्यायचं नाही असा निर्धार महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी बाळगला आहे. यामुळे मोदींना बळ देणारे खासदार निवडणू आणू. असा विश्‍वास व्यक्‍त केला. या मेळाव्यास शिरिष बोराळकर, डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रविण घुगे, आमदार अतुल सावे, श्रीकांत देशपांडे, विजय औताडे, अनिल मकरिये, सुरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, साधना सुरडकर, मंगलमुर्ती शास्त्री, विकास कुलकर्णी, दीपक ढाकणे उपस्थित होते.