मुंबई – पुणे एक्सप्रेस वे १२ ते २ दरम्यान बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईहून पुण्याकडे येणारा एक्सप्रेस वे गुरुवारी १० जानेवारीला दुपारी १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे.

एक्सप्रेस वे वर ओव्हरहेड गंट्रीज (जाहिरातीचा सांगाडा) बसविण्यात येत आहे. या बोर्डवर वाहतूकीची माहिती दिली जाणार आहे. हा इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसविण्यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या दरम्यान एक्सप्रेस वे वरील वाहतूक रासायनी ते मांडप या जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीही या कामासाठी असाच दोन तासाचा ब्लाॅक घेण्यात आला होता.