सीमकार्डावरुन पोलीस पोहचले खुन्यांपर्यत

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण रेल्वे यार्डातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका २३ वर्षाच्या महिलाचा मृतदेह कोळसेवाडी पोलिसांना १ जानेवारीला आढळून आला होता. तिची कोणतीही ओळख पटू शकत नसता, त्याच्या अगावरील कपड्यांमध्ये सापडलेल्या मोबाईलच्या सीमकार्डवरुन पोलीस पोहचले थेट उत्तर प्रदेशात आणि त्यांना खुन्यांचा छडा लावण्यात यश आले. त्यामागचे कारणही धक्कादायक होते.

विवाहित बहिणीचे परपुरुषाशी असलेल्या अनैतिक संबंधावरून गावात व समाजात बदनामी झाल्याने वडिलांच्या सांगण्यावरून भावंडांनी तिची हत्या केल्याचा प्रकार तपासात उघड झाला.

कल्याण रेल्वे याडार्तील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेवीस वर्षीय महिलेचा मृतदेह १ जानेवारीला आढळला होता. तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. परंतु, सीमकार्डवरून तपास केला असता तिचे नाव मनिता यादव (रा. मौलानापूर, आजमगढ, उत्तर प्रदेश) आहे. ती घरातून चार दिवसांआधीच निघून गेली आहे.  ती बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिसात दाखल झाली होती. तिचा भाऊ तीर्थराज विक्रोळीत राहत असल्याचे समजले.

दरम्यान, तीर्थराजच्या कॉल डिटेल्स रेकार्डवरून लोकेशन व कल्याण रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मनिता, भाऊ पप्पू,मनोज, हे कामायनी एक्स्प्रेसमधून ३१ डिसेंबरला पहाटे ३ वाजता कल्याणला उतरल्याचे दिसून आले. पहाटे ४.२१ चे फुटेज तपासले असता फक्त मनोज व तीर्थराज हे फलाटावर परतताना दिसले. मात्र, त्यात मनिता नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तीर्थराजची चौकशी करताच त्याने इतर भावांच्या साथीने मनिताची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे भासवल्याचे तो म्हणाला.

पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीर्थराज, मनिताचे वडील लौटू यादव, रमाकांत ऊर्फ पप्पू व आतेभाऊ मनोज यादव अशा चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर, तीर्थराजला पोलिसांनी अटक केली आहे.

 उत्तर प्रदेशातून महिलेला आणून मुंबईत तिचा खुन करुन टाकून देण्याचा हा गुन्हा खरं तर उघडकीस येण्याची थोडीही शक्यता नव्हती. कारण तिला ओळखणारे मुंबईत कोणी नव्हते. पण, तिच्याकडच्या सीमकार्डने पोलिसांना एक धागा मिळवून दिला आणि पोलिसांनी त्यावरुन आनर किलिंगचा हा प्रकार उघडकीस आणण्यात यश मिळविले.