जिच्यासाठी धर्म बदलला तीच गेली सोडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं…हेच खरं! आपलं प्रेम सिध्द करण्यासाठी त्याने मुस्लिम धर्म साेडून हिंदु धर्म स्विकारला मात्र, जिच्यासाठी एवढा खटाटोप केला तीच त्याला सोडून जात आहे. हा प्रकार घडलायं नवी दिल्लीत.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00a398b0-aac9-11e8-81a3-c1a64ba59c4e’]

33 वर्षीय एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदु प्रेयसीसाठी धर्म  बदलला. रायपुर येथील २३ वर्षीय आर्या हिचे एका मुस्लिम तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ताे मुस्लिम असल्याने तिच्या घरच्यांचा या नात्याला विरोध हाेता. त्यामुळे त्याने मुस्लिम धर्माचा त्याग करुन हिंन्दु धर्माचा स्विकार करुन धर्मांतर केले. पण, त्यांचे प्रेम जास्त दिवस बहरलेच नाही. त्यांने १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात मुलीच्या पालकांविरोधात ‘हेबियस कॉर्पस’ (प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली. त्यात त्याने पालक व एक हिंदु संघटना बळजबरीने आपल्याला वेगळे करत आहे असा आरोप केला आहे.

लोकसभेच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढणार 

यावर सुनावणी करताना, सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी आर्याचे वकील निखील नायर यांचा युक्तिवाद ऐकला. सोमवारी तिच्याशी बोलण्याच्या आतच राज्याचे महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा ह्यांनी याचिकाकर्ता दोन वेळा घटस्फोटीत असुन त्याने हे लपवुन ठेवल्याने, हे लग्न बेकायदा असल्याचे स्पष्ट केले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f48d57e-aac9-11e8-8606-ed1bc2f82b15′]

यावर बोलताना मुलीने सांगितले की, मी जरी लग्न केले असले तरी मला माझा पालकांसोबत राहायचं आहे आणि माझावर कोणत्याही प्रकारचा दबाब नाही असे तिने स्पष्ट केले.

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

मुलगी सज्ञान असुन तिला आपल्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र आहे. तिला तिच्या पतीकडे जायचे नसल्यास हे प्रकरण योग्य कोर्टात वळत करता येउ शकते. तसेच मुलगी आपल्या इच्छेनुसार लग्न झाल्यानंतर सुध्दा आपल्या पालकांकडे राहण्याचा अधिकार कोर्टाने मान्य केला.