तोतया पोलिसाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगून तोतयागिरी करणाऱ्या एका तोतया पोलिसाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.२६) रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे सोलापूर रोड वरील १५ नंबर चौकात करण्यात आली.

निखील केशव जाधव (वय-२५ रा. शेवाळवाड, ता. हवेली, जि.. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संतोष दगडु राठोड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील जाधव या तोतया पोलिसाने आपण सातार पोलीस दलात कार्यरत असल्याचे फिर्य़ादी आणी त्यांच्या सहकार्याला सांगितले. तसेच त्याने त्याच्याकडे असलेला बनावट ओळखपत्र आणि बक्कल नंबर सांगितला.

फिर्यादी यांना संतोष राठोड यांना संशय आल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. पोलीस नसताना देखील इतरांची फसवणूक केल्याप्ररकणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.