अबब… या गुलाबी हिऱ्याची एवढी किंमत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिरा परिधान करणे हे सर्वांचेच स्वप्न असते. काही जण ज्योतिष्याच्या सांगण्यावरुन अमूक जातीचा हिरा वापरला तर, तुमचे भविष्य उजाळून निघेल, असे सांगितले जाते. राशीनुसारही हिरा असलेल्या आंगठ्या बाजारात अनेकांकडून विकल्या जातात. जगभरात हिऱ्याचे विशेषत: दुर्मिळ हिऱ्याचे लिलाव होत असतात. अशाच एका स्वित्झलंडमध्ये झालेल्या लिलावामध्ये १९ कॅरेटच्या दुर्मिळ गुलाबी हिरा तब्बल ३६३ कोटी रुपयांना विकला गेला आहे.

जिनेव्हा येथे मंगळवारी या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश आॅक्शन हाऊस ख्रिस्टियनने हा लिलाव केला. या लिलावामध्ये प्रसिद्ध जवाहिर हॅरी विन्स्टन यांनी ५ कोटी डॉलर (सुमारे ३६३ कोटी रुपये) एवढी बोली लावून हा हिरा खरेदी केला. याबरोबरच हा हिरा आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरला आहे.

चिंताजनक… दररोज २ हजार शेतकरी शेती सोडून रोजगाराकडे वळतात : पी. साईनाथ 

ब्रिटिश आॅक्शन हाऊस ख्रिस्टियनच्या ज्वेलरी विभागाचे प्रमुख राहुल कदाकिया यांनी हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यापैकी एक असल्याचे सांगितले. सुरुवातीला हा हिरा ओपनहायमर कुटुंबीयांकडे होता. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत डी. बीयर्स डायमंड मायनिंग कंपनीचे संचालन केले होते. यापूर्वी १९ कॅरेटच्या पिंक हिऱ्याची कधीही विक्री झालेली नाही. आतापर्यंत १० कॅरेटहून अधिक कॅरेटच्या केवळ चार पिंक हिऱ्यांची विक्री झालेली आहे.
गतवर्षी १५ कॅरेटच्या एका गुलाबी हिऱ्याला हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात सुमारे ३ कोटी २५ लाख डॉलर एवढी किंमत मिळाली होती. त्यावेळी या हिऱ्यासाठी २१ लाख ७६ हजार डॉलर प्रति कॅरेट एवढी विक्रमी बोली लागली होती. हा हिरा १०० वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधील एका खाणीमध्ये  सापडला होता.