मी केवळ अजय देवगण मुळेच यशस्वी झालो- रोहित शेट्टी

मुंबई : वृत्तसंस्था – दिग्दर्शक रोहित शेट्टी आता बॉलिवुड मधील सर्वात आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने सलग ८ हिट चित्रपट दिले आहेत. या प्रत्येक चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या यशाचे श्रेय त्याने अभिनेता अजय देवगणला दिलं आहे.
रोहितने अजयसोबत गोलमाल, गोलमाल अगेन, गोलमाल-३, सिंघम, सिंघम रिर्टन या चित्रपटात काम केलं आहे. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळेच रोहित आपल्या यशाचे श्रेय अजयला देतो.

मी आज जो कोणी आहे ते केवळ अजय देवगनमुळे, तो माझा मोठा आधारस्तंभ आहे. माझ्या आयुष्यातील त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. रणवीर माझ्यासाठी लहान भावासारखा आहे पण, अजयचं माझ्या आयुष्यातील स्थान खूपच खास आहे. ‘ असं म्हणत रोहितनं म्हटलं आहे.

बॉलिवूडध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगनचे समीकरण खूपच खास आणि वेगळे आहे. ही जोडी बॉलिवूडमधली हिट जोडी आहे. लवकरच ‘गोलमालचा’ चौथा भाग घेऊन ही जोडी रुपेरी पडद्यावर परतण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील महिन्यात रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सिम्बा’ने अवघ्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.