शाळेमध्ये भीषण स्फोट, १७ विद्यार्थी गंभीर जखमी

जम्मू-कश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये एका खाजगी शाळेत मोठा स्फोट झाला. पुलवामाच्या काकपोरा परिसरातील फलाही-ई-मिलात शाळेमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात १७ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे.

जमखी विद्यार्थ्यांना पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून आणखी विद्यार्थ्य़ांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. शाळेमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे स्फोट झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, शाळेमध्ये दहावीचे विद्यार्थी होते. जखमींवर सध्या उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सुदैवाने या स्फोटात अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आता शालेय शिक्षकांची आणि व्यवस्थापनाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर शाळेमध्ये अशा पद्धतीने स्फोट होणं म्हणजे हा शाळेचा भोंगळा कारभार असल्याची टीका आता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.