दरोड्याच्या तयारीतील टोळी अटकेत 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – भोसरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत तिन गुन्हेगारांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

मंगेश शुक्राचार्य मोरे (21, रा. आळंदी रोड, भोसरी), आकाश अशोक राठोड (24, रा. महादेव नगर, भोसरी), दत्ता उत्तम पवार (20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार सागर वाडाने व अमित शेकापुरे हे फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई नितीन खेसे यांना माहिती मिळाली की, लांडेवाडी रोड येथे एका कार जवळ काही इसम हे संशयीतरित्या थांबले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. त्यानुसार खंडणी व दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी भोसरी पोलीसांच्या सहकार्याने सापळा रचून आरोपींचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मिरची पुड, एक कोयता, एक पालघन, लोखंडी तलवार, पाच मास्क व गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी (एम एच 12 / पी क्‍यू1813) क्रमांकाची ऍसेंट कार असा सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त केला.

या तिघांनी भोसरी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी पोलीस तपासात कबुल केले. यातील मंगेश मोरे हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर मारहाणीचे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच मोर व दत्ता पवार यांच्यावर मारहाण, दहशत पसरवणे, शांती भंग करणे असे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, प्रमोद कठोरे तसोच पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, राजेंद्र शिंदे, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, नितीन खेसे, सुधीर डोळस, प्रवीण माने, सुमित देवकर, समीर रासकर यांच्या पथकाने केली.

संभाव्य धोके टाळण्यासाठी सज्ज राहा : पोलीस महासंचालक