सराईत गुंडासह गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणारे तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गर्दीचा फायदा घेत बस, लोकल ट्रेनमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील चार जणांना शहर, पिंपरी चिंचवड़ आय़ुक्तालय व जिल्ह्यातून सहा महिन्यांकरता तडीपार करण्याचे आदेश परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी दिले आहेत.

नितीन उर्फ हुबळी नित्या शंकर जाधव (२४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा), अविनाश राधेशाम ठाकूर (३०), वसंत विजय जाधव (३४) रवि यलप्पा गायकवाड (३४, मुंढवा) अशी तडीपार करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढती लोकसंख्या व गर्दीमुळे बस व लोकल ट्रेनमध्ये प्रचंड प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा घेत चोरी करणाऱ्या टोळ्या नागरिकांना लुटण्याचे काम करतात. त्यामुळे अशाच प्रकारे चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलीस ठाण्याकडून तयार करून परिमंड़ळ चारचे पोलीस यांच्याकडे पाठविण्यात आला.

त्यासोबतच घोरपडी परिसरातील सराईत दीपक दत्तू सुर्यवंशी (३१, घोरपडी गाव यालाही पोलिसांनी सहा महिन्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आय़ुक्तालय व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी व कर्मचाऱ्यांनी केली.