आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दुसरा टी-२० सामना 

उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था  – भारत आणि वेस्ट इंडिजयांच्यात आज लखनऊ मध्ये दुसरा टी – २० सामना रंगणार आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य हे कि या आधीच कोलकत्यात पार पडलेला सामना भारताने जिंकून १-०अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहली याच्या गैरहजेरीत हा सामना खेळला जाणार असून लखनऊचे प्रेक्षक या सामन्याची आस लावून बसले आहेत. वेस्ट इंडिजची पराभव पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. कसोटी , एकदिवसीय आणि आता टी २० या मध्ये सलग परवाच्या गर्तेत वेस्ट इंडिज जाताना दिसतो आहे.

आजचा सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडिजची टीम पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडिजचे कर्णधार पद भूषवितो आहे तर भारताचे कर्णधारपद ३१ वर्षीय रोहित शर्मा याच्या कडे सोपवण्यात आले आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीची मोठी किंमत भारताला गेल्या सामन्यात मोजावी लागली असती परंतु वेस्ट इंडिजने पहिल्या डावात फलंदाजीचा खराब खेळ केला आणि  भारताला ११० धावांचे लक्ष दिले. भारताने सुरुवातीलाच दोन ओव्हर मध्येच दोन विकेट गमावल्या चौथ्या ओव्हर अखेर ३४ धावा आणि तीन विकेट असा काटशहा खेळ करून वेस्ट इंडिजने भारताला घाम फोडला. परंतु भारताने डगमगत्या स्थितीत ११० हे लक्ष गाठले आणि सामना आपल्या नावे करून घेतला.

भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत होतं का? : अशोक चव्हाण 

आजचा सामना वेस्ट इंडिजसाठी करा अथवा मरा असा असणार आहे. कारण सततच्या पराभवामुळे संघाचे मनोबल खचत चालले आहे. भारताच्या विजयी अश्वाला रोखण्यासाठी वेस्ट इंडिज पुरेपूर लढत देण्याच्या तयारीत आहे. भारत-वेस्ट इंडिज सामना सांयकाळी सात वाजता सुरु होणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू पुढील प्रमाणे-
भारत। रोहित शर्मा (कर्णधार),शिखर धवन, राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.

वेस्ट इंडिज। कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हिटमायेर, शाय होप, ओबेड मॅककॉय, कीमो पॉल, खेरी पेरी, कायरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रूव्हमॅन पॉव्हेल, दिनेश रामदिन, शेरफॅन रदरफर्ड, ओशॅन थॉमस.