भाडेकरूनेच केली घरफोडी ; 18 तोळे सोने, पाच तोळे चांदी हस्तगत

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – मालकाच्या घरी घरफोडी करणारा भाडेकरू रवींद्र शंकर ताटीकोंडा यास कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 18 तोळे सोने व 5 तोळे असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
व्यंकटेश रामैय्या बुरा वय-७० वर्षे धंदा- रा. ४२३८ गौरी घुमट तुळज़ादेवी मंदिराच्या पाठीमागे धारावाडा आंनदीबाजार अहमदनगर यांनी फिर्याद दिली की,  त्यांचे राहते घर बंद करुन हैद्राबाद येथे लग्नासाठी गेले असताना दि. २६ डिसेंबर चे रात्रीचे ०१ ते या ते ०४ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे राहते बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन घरातील बेडरूमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन कपाटात ठेवलेले सोने चांदीचे २,५४,००० हजारांचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेले आहेत. त्यावरुन त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली लागलीच एक तपास पथक तयार करुन त्यांना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या सदर गुन्हयाचा तपास चालू असताना गोकावे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फिर्यादी यांचेकडे भाडयाने राहणारा इसम नामे हा गन्हा घडल्यापासुन गायप असुन तो नगर मनमाड रोड वरील राहुरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई नागवे, पोहेक/ पालवे, पोना, शाहिद शेख, पोना/गाडगे, पोना/गवारेपोना/दुधाळपोकॉ/ इंग/ पोक/ लहारे/ पोक/ शेख व पोक/ मोहिते यांना त्यास ताब्यात घेण्याबाबत कळविले. त्यास ताब्यात घेवून त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची 2 जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यानसदर गुन्हा कबुल केला असून त्याने सदर गुन्हयात चोरी गेलेले १८ सोने, मोती ५ तोळे चांदीचे दागिने असे एकुण ४,५२,००० / रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिणे काडुन दिले आहे तरी सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.