पुण्यातील वर्दळीच्या चौकात हिट अॅड रनचा प्रकार, २ गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील वर्दळीच्या चौकामध्ये एका भरधाव कारने पादचारी मार्गावरुन जाणाऱ्या दोघांसह एका दुचाकीला धडक दिली. या घटनेनंतर कारमधील चारजणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. हा प्रकार नरपतगिरी चौकात आज (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमरास घडला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नरपतगिरी चौकात खळबळ उडाली होती.

ज्युली अनिल कोस्टी, सुनिल अवताडे हे दोघे यामध्ये जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती समर्थ पोलिसांनी दिली.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास नरपतरिगी चौकाडून अपोलो टॉकिजच्या दिशेने एक कार भरधाव वेगात जात होती. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ती पादचारी मार्गावर चढली. त्यावेळी तेथून जाणार्‍या मुलीला धडक दिली. त्यानंतर ही कार समोरच्या दुकानासमोर जाऊन थांबली.

कार वेळीच थांबली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. अपघातानंतर कारमधील चौघांनीही तेथून पळ काढला. संतप्त झाल्याने नागरिकांनी कारची तोडफोड केली. तर जमखींवर रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.