आयफोन बनविणारी अ‍ॅपल कंपनीचे मुल्य १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षा जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अ‍ॅपल या कंपनीचे भांडवली मुल्य जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे़ अ‍ॅपल कंपनी  ही १ ट्रिलिअन डॉलर किंवा एक लाख कोटी रुपयांचं भांडवली बाजारात मूल्य असणारी पहिली अमेरिकन कंपनी बनली आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची भांडवली बाजारातील मूल्य सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, अ‍ॅपल कंपनीची शेअर बाजारातील पत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे.

अ‍ॅपल कंपनी सध्या इतकी ताकदवान बनली आहे की, ती ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशापेक्षाही जास्त किंमत तिच्या एकत्रित शेअर्सच्या मूल्यांची आहे. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अ‍ॅपल ही १० पट मोठी कंपनी ठरली आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अ‍ॅपलच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा श्रीमंत अ‍ॅपल कंपनी आहे. सध्या अ‍ॅपलचे बाजार मूल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीइतके आहे.
[amazon_link asins=’B07CC1X3DY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1aaec3e-96f3-11e8-b5dc-1733dbc278b5′]

अ‍ॅपलच्या शेअरचा भाव एका वर्षात २३ टक्क्यांनी वाढला आहे. अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी आपल्या आर्थिक स्थितीची तसेच उत्पन्नाची कल्पना गुंतवणूकदारांना दिली होती. कंपनीच्या समाधानकारक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर्सची मोठ्या प्रमााणावर खरेदी केली व एकाच दिवसात हा शेअर ६ टक्क्यांनी वधारला. त्यामुळे अ‍ॅपलचे भांडवली बाजारातील मूल्य एक ट्रिलियन डॉलरच्या घरात गेले असून हा मान मिळवणारी ती पहिली अमेरिकन कंपनी बनली आहे.