बेरोजगार युवक विद्यमान सरकारला धुळ चारणार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिेषदेचे विरोधी पक्ष नेते, एन. सी. पी. चे आमदार धनंजय मुंडे हे बीड दौऱ्यावर असताना एका चहाच्या स्टॉला भेट दिली. त्या दरम्यान त्यांनी चहाचा आस्वाद घेत चहाचे चक्क २ हजार रुपये दिले. आणि राज्यातील विद्यामान सरकारला सेडेतोड प्रश्न विचारले आहेत.

समाज शास्त्र या विषयात एम. ए. केले, MPSC च्या PSI परिक्षेत थोड्या गुणांणमुळे त्या युवकाचे थोडक्यात पद हुकले. दुसरीकडे कुठेच नोकरी मिळत नसल्याने हातबल होऊन त्याने बीडच्या डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवनासमोर नितीन धुताडमल या युवकांने  चहाची टपरी टाकली. यामधून त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्या वेळी धनंजय मुंडे यांनी पदवीधर टी स्टॉलला भेट दिली. चहाचा आस्वाद घेतला. त्याच्या हाताला चव आहे, पण बोलतांना जाणवले की त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक खंत आहे, चहा बनवून विकण्यासाठी मी शिकलो आहे का ? त्याला सतवत असल्याचे मुंडे म्हणाले.

केंद्रात सत्ता असणाऱ्या मोदी सरकारं जनतेला रोजगाराबाबत खोटी आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे नितीन धुताडमल युवकाने चहाच्या टपरीला पदवीधर असे नाव देऊन विद्यामान सरकारला चपराक दिली आहे. देशातील हजारो युवकांना हतबल होण्यची वेळ भाजप सरकारमुळे आली आहे, येणाऱ्या निवडणूकीत भाजपा सरकारला बेरोजगार तरुण धूळ चारतील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.