ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींसमोर मंत्र्याने केला महिला मंत्र्याला चुकीचा स्पर्श

आगरतळा : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या समोर एका मंत्र्याने महिला मंत्र्याला चुकाच्या पद्धतीने स्पर्श केला. हा प्रकार त्रिपुरामध्ये एका सभेदरम्यान घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून विरोधकांनी या मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देव यांच्या सह अन्य नेते अगरतळा येथे झालेल्या सभेला उपस्थित होते. व्यासपीठावर मंत्री मनोज क्रांती देव यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी सामाजिक न्याय आणि शिक्षण मंत्री असलेल्या संतना चकमा यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. देव यांनी चकमा यांच्या कमरेला हात लावल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

महिलेला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे स्पर्श करणे चुकीचे असल्याचे डाव्या पक्षाचे नेते बिजन धर यांनी म्हटले आहे. धर यांनी देव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देव यांनी मंत्री चमका यांच्या कमरेवर हात ठेवल्याचे दिसत आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या