कोल्हापूरातील कात्यायनी मंदिरात चोरी

कोल्हापूर | पोलीसनामा ऑनलाईन 
कोल्हापूरातील ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात शिरुन चोरट्यांनी देवीचे २ किलो चांदीचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मध्य प्रदेशात रामन राघव
कोल्हापूर येथून १२ किलोमीटर दूर असलेल्या कसबा भागात हे ऐतिहासिक मंदिर असून चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. व देवीचे दागिने चोरुन नेल्याचे बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आला. त्यानंतर पुजाºयांनी याची माहिती सकाळी सात वाजता करवीर पोलिसांना दिली.
[amazon_link asins=’B07FH4PDHJ,B07DB85QZ3,B0756VRJ1X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’483a8c23-b652-11e8-9067-c5f62c88f743′]
त्यानंतर पोलीस मंदिराकडे रवाना झाले़ मंदिरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर मंदिराच्या परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
चोरट्याने रात्रीच्या सुमारास खिडकीवाटे आत प्रवेश करुन चोरी केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण केले असून त्याद्वारे चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोल्हापूरमधील हे ऐतिहासिक मंदिर असून त्याचा महात्म्य करवीर पुराणातही आढळून येते.