सेंट्रल बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, दहा लाखांची रक्कम पळविली

पातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पातूर-अकोला रोडवरील कापसी गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून तब्बल दहा लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डी. सी खंडेराव त्यांच्या पोलीस पथकासह तेथे हजार झाले. सेंट्रल बँक शाखा कापसीचे व्यवस्थापक राहुल प्रतीते यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध कलम ३८०, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखी गाडी या गुन्ह्यासाठी वापरण्यात आल्याची माहीत सूत्रांनी दिली. अकोला येथील श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, अकोला पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी बाळापूर सोहेल शेख, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. सेंट्रल बँक शाखा कापसीचे व्यवस्थापक राहुल प्रतीते यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध कलम ३८०, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.