राजकीय

नेता आणि नीती नसणाऱ्या पक्षाला निवडणुकीत पराभूत करा – अमित शहा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेता आणि नीती नसणाऱ्या पक्षाला तुम्ही मतदान करू नका असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणले आहे. त्याच प्रमाणे भारतीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी अमित शहा यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. काँग्रेस पक्षाला नेता आणि विचार नाही म्हणून आपण त्या पक्षाला मतदान करू नका. भाजपला २०१९ साली सत्ता मिळाली तरच या देशाचे भले होईल असे अमित शहा यांनी म्हणत तरुणांनी आणि गरिबांनी मोठ्या प्रमाणात या निवडणुकीला मतदान करावे असे अमित शहा यांनी म्हणले आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे उदाहरण देत अमित शहा यांनी पानिपतावर मराठे हारले आणि देश २०० वर्षे मागे गेला आता हि तशीच वेळ आली आहे. आपण नेतृत्व नसलेल्या आणि नेता नसलेल्या पक्षाला मतदान केल्यास देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल असे अमित शहा यांनी म्हणले आहे. या देशावर काँग्रेसने ७० वर्षे राज्य केले मात्र या देशाचा विकास त्यामानाने झाला नाही. देशाचा विकास आणि देशाचा गौरव या पाच वर्षात वाढला आहे. २०१४ साली आम्हाला सत्ता मिळाली तेव्हा भाजपची ६ राज्यता सत्ता होती आता १६ राज्यात भाजप सत्तेवर आहे असे अमित शहा म्हणाले आहेत. तर देशाच्या गतिमान विकासासाठी आपण नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत बसवा असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगविख्यात नेते आहेत. त्यांच्या मागे देशातील जनता पर्वतासामान उभी आहे. या पाठीशी असणाऱ्या जनतेच्या पाठींब्यावर पुन्हा एकदा आमचेच सरकार केंद्रात विद्यमान होईल असे आत्मविश्वासात्मक विधान अमित शहा यांनी केले आहे. काँग्रेस काय आणि महाआघाडी काय दोन्हींना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे असे अमित शहा म्हणाले आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराज  या महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्वांची नावे अमित शहा यांनी आपल्या भाषणात घेतली आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या