लोकसभा निवडणुकांसाठी ‘या’ आहेत संभाव्य तारखा ; ‘प्राब’ चा अंदाज 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २८ एप्रिलला मतदान घेण्यात येऊ शकते तर ५ आणि १२ मे मध्ये अनुक्रमे दुसऱ्या  व तिसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. या संभाव्य लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून ७ ते १२ मार्च २०१९ दरम्यान होणाची संभावना असून नामनिर्देशन पत्र पहिल्या टप्प्यासाठी १५ एप्रिल २०१९ तर दुसऱ्या टप्प्यासाठी २१ एप्रिल २०१४ पासून उपलब्ध होऊ शकणार आहे.

देशात एकूण ९ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील व अंतीम मतदानानंतर २६ अथवा २८ मे २०१९ रोजी मतमोजणी देशभरातील सर्व मतदारसंघातील एकत्रितपणे होऊ शकणार  असा अंदाज “पॉलिटिकल रिसर्च ॲण्ड ॲनालिसेस ब्युरो’’ ने व्यक्त केला आहे. “पॉलिटिकल रिसर्च ॲण्ड ॲनालिसेस ब्युरो’’ ही राजकीय क्षेत्रातील नामवंत सल्लागार संस्था आहे. राजकीय क्षेत्रात शिक्षण व प्रशिक्षण देणारी पहिली सर्वेक्षण व ॲनालिसेस करून देणारी एकमेव संस्था आहे. त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

प्राबने वर्तवलेल्या अंदाजानुसार- संभाव्य निवडणुक कार्यक्रमानुसार इच्छूकांना लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी केवळ ८० दिवस उरले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश एका लोकसभा मतदारसंघात असल्याने व्यापकतेनुसार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कल्पक व अत्याधुनिकीकरण सुविधांचा वापर करावा लागणार आहे. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये  निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही संस्थेने केले आहे.
लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा असू शकेल कारण…..
—  लोकसभा मुदत- ४ जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
  –११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
  –लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
  –अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल.
  –विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारी २०१९ पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
 — गुरुवार २१ फेब्रुवारी २०१९ ते बुधवार २० मार्च २०१९ या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
 — शुक्रवार १ मार्च २०१९ ते शुक्रवार २२ मार्च २०१९ दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
— सीबीएसई बोर्डाच्या १२वी ची परीक्षा १५ फेब्रुवारी पासून ३ एप्रिल दरम्यान होणार आहे.
 — सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत असणार आहे.
 असे होइल महाराष्ट्रात मतदान…..
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये  मतदान होण्याची शक्यता आहे.
पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.
खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम
खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले
खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड