भिवंडीतील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौघांना पकडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात मुंबईतील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे. त्यात एका संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. तिघांच्या अटकेची कारवाई करून त्यांना पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक केलेल्यांमध्ये किशोर मंत्र्या चव्हाण (वय- ३० वर्षे, रा. वाघुंडे, ता.पारनेर), किरण दगडू भोसले (वय- २४ वर्षे, रा. भोयरे गांगर्डे, ता पारनेर), साईनाथ गजानन काळे (वय- २१ वर्षे, रा. दहीगाव साकत, ता. नगर) यांचा समावेश आहे.

रविवारी (दि. 27) गांगडें वस्ती, धोत्रे शिवार, ता. पारनेर येथे शिवनाथ गणेश भोईर, शाम बारक्या भोईर, करण आकाश भोईर, राजकुमार रतनचंद बुढाई (सर्व रा. मानकोली, ता- भिवंडी, जि- ठाणे) हे बकऱ्या विकत घेण्याकरीता आले असताना १० ते १२ अनोळखी आरोपींनी चार इसमांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचेकडील २ लाख ३२ हजार रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिणे असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता.

सदर घटनेबाबत पारनेर पो.स्टे. गुरनं. ८६/२०१९, भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खबऱ्याकडून माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा करणारे काही आरोपी सुपा बस स्टेंड जवळ येणार असल्याची खात्रीशीर मिळाल्याने पोनि दिलीप पवार यांनी त्यांचे सोबतचे अधिकारी पोसई रोहन खंडागळे, पोसईज्ञानेश फडतरे, पोसईगणेश इंगळे, पोसई/सचिन खामगळसफौसोन्याबापू नानेकर, पोना/भागीनाथ पंचमुख, मल्लिकार्जुन बनकर, रविन्द्र कर्डीले, दिगंबरकारखेले, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, सुनिल चव्हाण, मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, दिपक शिंदे, रवि सोनटक्के, बाळासाहेब मूळीकमोहन गाजरे, संदीप पवारमनोज गोसावी, विजय ठोंबरे, दत्ता गव्हाणे, मपोना/सविता खताळ, सुमेघा वाघमारे, चालक बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, देविदास काळे, संभाजी कोतकर, सचिन कोळेकर, दत्ता हिंगडे
विनोद मासाळकर व स्टाफ अशांनी सुपा येथे जावून बस स्थानकाजवळ सापळा लावून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचे नावे व पत्ते विचारले असता त्यांनी स्वतःची नावे सांगितले.

त्यातील एक बालक विधिसंघर्षग्रस्त होते. त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केल्याची
कबुली दिली. त्यापैकी एका साथीदार हा आता सध्या त्याचे घरी आहे, अशी माहीती देवून सदर आरोपीचे घर दाखविल्याने आणखी एका साथीदारास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना पुढील तपासकामी पारनेर पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे