मला भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न केले होते : प्रणिती शिंदे 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राधा कृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हे भाजपच्या वाटेवर आहेत यात कित्पद सत्य आहे असा प्रश्न पत्रकारांनी प्रणिती शिंदे यांना विचारला असता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुजयचे काय मलामाहित नाही  परंतु मला हि भाजपच्या लोकांनी भाजपमध्ये सामील व्हायचे आमिष दाखवले होते. मी कट्टर राष्ट्रभक्ती आणि काँग्रेसची कार्यकर्ती असल्यामुळे मी त्यांचे अमिश धुडकावून लावेल असा गौप्यस्फोट प्रणिती शिंदे यांनी केला आहे. प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य मतदार संघातून काँग्रेसच्या आमदार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर येथे काल बुधवारी दौरा पार पडल्या नंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे उपस्थित होते. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुजय विखे पाटील यांच्या बद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मला भाजपमध्ये घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु मी काँग्रेसची कट्टर कार्यकर्ती असल्याने त्यांनी मला भाजपमध्ये घेण्याचा नाद सोडून दिला आहे. माझ्या रक्तातच काँग्रेस आहे तसेच आमचे शिंदे घराणे काँग्रेसचे निष्ठावान घराणे आहे असे प्रणिती शिंदे यांनी म्हणले आहेत.

सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपने चांगलीच बांधी केल्याने सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी पुढील निवडणूक सोपी राहिलेली नाही. संघटनात्मक बांधणी आणि  लोकसंपर्काच्या जोडीला नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांच्या दौऱ्यांनी सोलापूरचे वातावरण भाजपमय होत चालले आहे. अशात सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेची वाट अतिशय बिकट असल्याचे बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे असे वातावरण बघून सुशीलकुमार शिंदे यांनी शिर्डी मतदार संघातून हि उमेदवारीची मागणी केली आहे अशा हि चर्चा मागील काही काळात रंगात आल्या होत्या. अशा अवस्थेत सुशीलकुमार शिंदे लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहणार का नाही या प्रश्नाचे उत्तर तूर्तास देणे कठीणच आहे. मात्र आता घोडे मैदान दूर नाही हे हि तितकंच खरे आहे.