तीन प्रेयसींचे हट्ट पुरवण्यासाठी ‘तो’ बनला पाकिटमार

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – माणूस जेव्हा मनापासून कोणावरही प्रेम करतो, तेव्हा त्याच्या वागण्यात, मनात, हृदयात केवळ ती एकच व्यक्ती असते. मात्र, राजधानी दिल्ली येथील एका तरुणाचे तीन मुलींसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. या तीनही मुलींचे चोचले पुरवण्यासाठी त्याला डान्समधून मिळणारे पैसे कमी पडू लागले. त्यामुळे या डान्सरने पाकिटमारी करण्यास सुरुवात केली. त्याने सांगितलेल्या या माहितीने पोलीस देखील चक्रावून गेले.
दिल्लीतील गोविंदपुरी पोलिसांनी एका पाकीटमाराला अटक केली आहे. रोहन गिल उर्फ सन्नी (21) असे त्याचे नाव असून त्याच्या चौकशीत पोलिसांनाही चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. रोहनला एक-दोन नव्हे, तर तीन-तीन प्रेयसी आहेत, या तिघींचे हट्ट-लाड हट्ट पुरवण्यासाठी आपण पाकीटमार झाल्याचं रोहनने सांगितले आहे.
मुळचा आगऱ्याचा रहिवासी असलेल्या रोहनने दिल्लीत येऊन डान्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. उपजिवीकेचे साधन म्हणून त्याने पार्टी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांत डान्स करायला लागला. मात्र दारू आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. त्यातच तीन-तीन प्रेयसी सांभाळताना त्याच्या नाकी नऊ येऊ लागले. तीनही प्रेयसींचे हट्ट पुरवताना पगार पुरत नसल्याने त्याने  पाकीटमारी आणि मोबाईल चोरायला सुरुवात केली.  एका रिक्षाचालकाचा मोबाईल चोरल्याप्रकरणी राहुलला अटक झाली असून ही त्याची वर्षभरातील चौथी अटक आहे. अटक झाल्यानंतर प्रेयसींची शौक पुरवण्यासाठी आपण हा मार्गी स्वीकारल्याचं राहुलने कबूल केले आहे.