चालकाला धमकी देऊन प्रवाशांनी पळवली कार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – चिंचवड येथून प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करुन चालकाची मोटार पळवून नेल्याची घटना घडली.

या प्रकरणी विशाल नागनाथ रणदिवे (२०, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. तर चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १३) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी रणदिवे हे मारुती सुझुकी (एमएच-१२-एनबी-०८१८) या मोटारीतून चार प्रवासी घेऊन संभाजी नगर-चिंचवडहून कात्रजच्या दिशेने चालले होते. ते कात्रज घाट येथे आले असता प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी रणदिवे यांची मोटार तसेच त्यांच्याकडील १५ हजाराचा मोबाईल फोन व १५० रूपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख १५ हजार १५० रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

ट्रक अपघातामुळे पुण्यातील ‘या’ भागात वाहतूक कोंडी