सैराटच्या धडकेनंतर आता ‘या’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनणार

मुंबई | पोलीसनामा आॅनलाईन

‘सैराट’ मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेक ‘धडक’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर आता हिंदी चित्रपट निर्माता – दिग्दर्शकांची पाऊले मराठी चित्रपटाकडे वळली आहेत. ‘मला आई व्हायचंय’ या २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचाही हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0949fd4b-c4a2-11e8-ab60-d788c58f0ee1′]

अॅड. समृद्धी पोरे यांच्या ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘स्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमर काैशिक आणि निर्माता दिनेश विजान हे बनवणार आहेत. त्यांनी समृद्धी पोरे यांच्याकडून कायदेशिररित्या हिंदी रिमेकचे हक्क घेतले आहेत. काही दिवसातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात बाॅलिवूड तसेच हाॅलिवूडमधील दिग्गज कलाकार भूमिका साकारणार आहेत. मात्र अद्याप कलाकारांची नावे प्रसिद्ध करण्यात आले नाहीत.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23069569-c4a2-11e8-aa46-b9ae1d8a4002′]

उर्मिला कानेटकर यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गाैरविण्यात आले आहे. हा चित्रपट सरोगेटर मदर आणि तिचं आयुष्य रेखाटणारा आहे.

हेही वाचा-
कुणाल कुमारांचे ‘गोंधळ’ निसरताना भाजपची दमछाक
शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ : नरेंद्र मोदी
कॉम्प्युटर इंजिनीअर कडून वाहतूक पोलिसांना मारहाण
समाज कल्याण वसतीगृहातील विद्यार्थीनींच्या जेवणात आळ्या 
‘या’ कारणामुळे काँग्रेसने मनसेची साथ नाकारली 

जाहिरात