यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणपती सण जवळ येऊन ठेपला असून भाविकांनी श्रींच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, नोटाबंदीचे परिणाम, घसरणारा रूपया आणि दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर यामुळे महागाईने उसळी घेतली आहे. या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य आणि गोरगरिबांना बसत आहे. त्यातच गणपती सण जवळ येऊन ठेपल्याने या महागाईचा सामना करतच भाविकांना हा सण साजरा करावा लागणार आहे.
[amazon_link asins=’B009WNA9V6,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f84becce-b349-11e8-9c83-7dc74dbb5693′]

पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. भाज्यांच्या दरांनी गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठला आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पूजासाहित्य, सजावट, किराणा खरेदी आदी तयारी करणाऱ्या भाविकांना महागाईची झळ बसू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्तींचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पाव किलो कापरासाठी आता २५०-३०० रुपयांपासून ४०० रु.पर्यंत दर सांगितला जात आहे. कापूर ज्वलनशील असल्याने त्यावर १८ टक्के जीएसटी लागू होतो. त्यामुळे ही किंमत वाढली आहे. अगरबत्तीचे दरही ४०० रुपये किलो ते १००० रुपये किलोच्या दरम्यान आहेत. गेल्या वर्षी ३०० रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा ५०० ते ५२५ रुपयांवर पोहोचला आहे. पूजेचा संपूर्ण संचही २५० ते ३०० रुपयावरून ५० ते १०० रु.ने महागला आहे.

जाहिरात

प्रत्येक वस्तू आवश्यक असल्याने खर्चात कशी कपात करायची अशा विवंचनेत गणेशभक्त पडले आहेत. गणेशोत्सवाची चाहूल लागताच भाज्यांच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. भाज्यांचा साठा करता येत नसल्याने त्या किरकोळ किंमतीतच खरेदी कराव्या लागतात. दररोजच्या वापराशिवाय गणेशोत्सवाची खरेदी तसेच प्रत्येक कामासाठी वाहन वापरणे गरजे असते. परंतु, इंधन दरवाढीमुळे त्याचाही भुर्दंड बसत आहे.

वाढलेल्या महागाईमुळे यंदा गणेश मंडळांचेही बजेटही वाढणार आहे. मागील वर्षापेक्षा मंडळांच्या खर्चाचे आकडे वाढणार आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्ववार महागाईच सावट दिसून येत आहे. खिशाला बसणारी झळ सहन करत भाविकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

जाहिरात