विसर्जन मिरवणुकीत हजारो मोबाईल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाईल लांबविण्याच्या हजारो घटना रविवारी दिवसभरात घडल्या. काही चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून काही मोबाईल जप्तही करण्यात आले आहेत. मोबाईल चोरण्यासाठी या टोळ्यांनी लहान मुलांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. डेक्कन पोलिसांनी दोघा चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून २५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’081888a2-bfc8-11e8-89b1-f770788f83bd’]

लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते नगरकर तालीम चौक या दरम्यान तसेच मंडई ते बेलबाग चौक दरम्यान सर्वाधिक मोबाईल चोरीला गेल्याचे आढळून आले आहे.

मोबाईल चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांची विसर्जन मिरवणुकीत नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या डोळ्यात धुळ चारुन चोरट्यांच्या टोळ्यांनी हजारावर मोबाईल लांबविले आहेत. दगडशुठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून पुढे लक्ष्मी रोडला मार्गस्थ झाल्यानंतर अनेकांनी आपले मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मंडई पोलीस चौकीतही अनेकांनी मोबाईल, पाकिट चोरीला गेलेल्याची तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. त्यातील जवळजवळ सर्वांना पोलिसांच्या वेबसाईटवरील लॉस्ट अँड फाऊंड वर तक्रार देण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत नेमके किती मोबाईल चोरीला गेले याचा आकडा सांगता येत नसला तरी हजाराहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ढोल ताशाच्या गजरात पुण्यातील गणपतींचे विसर्जन

गर्दीत चोरी करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी पकडले असून त्यात मोबाईल चोरी करणाऱ्यांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. या मुलांकडे चौकशी करण्यात येत असून त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’9386850567,8182748267′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13000447-bfc9-11e8-8d43-9de2e09b94f7′]