पिस्तूलाच्या धाकाने जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – घरामध्ये घुसून घरातील ज्येष्ठ नागरिकांना पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करुन १ कोटीची खंडणी मागणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. डेक्कन परिसरातील सरोज सदनमध्ये या टोळीने पिस्तुल आणि चाकूच्या धाकाने जबरी चोरी केली होती. या गुन्ह्यात मुंबई येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून १० लाख ८१ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

किरण किशोर तावडे (वय-३६ रा. अशोका गार्डन, शिवडी, मुंबई), दिपक शिवाजी मेदगे (वय-३८), पारस ठाकुर सोलंकी (वय-२८ रा. खेरवाडी वेस्ट), सचिन स्टॅनी डिसोजा (वय-२८ रा. खेरवाडी ईस्ट), गणेश जनार्धन गोरे (वय-२४ रा. जयशिवसाई कॅम्प, बांद्रा ईस्ट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे साथिदार अब्दुल हादी उर्फ रिजवान उर्फ भाईजान सत्तार शेख (रा. जनतानगर, चेंबुर पश्चिम), रविकुमार लक्ष्मणप्रसाद सोनी (रा. लोखंडे मार्ग चेंबुर पश्चिम) हे फरार आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपटे रोडवरील सरोज सदन येथे १६ जानेवारी २०१८ रोजी सकाळी साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान जबरी चोरी केली होती. चोरी करताना त्यांनी घरातील ज्येष्ठ नागरिक हंसराज खेमजी आणि त्यांची मेव्हणी हेमा छेडा तसेच घरातील नोकरांना पिस्तुलाचा आणि चाकूचा धाक दाखवला. या टोळीने घरातील पाच लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. तसेच घरातील लोकांना ठांबून ठेवून १ कोटची खंडणी मागितली.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी परिरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली होती. दरम्यान, युनिट १ चे पोलीस हवालदार योगेश जगताप व पोलीस नाईक सुधीर माने यांना आरोपींची माहिती मिळाली. आरोपींना पकडण्यासाठी युनिट १ चे एक पथक मुंबईला रवाना करण्यात आले. पथकाने आरोपींचा शोध घेऊन पाच जणांना अटक केली. आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दिपक शिवाजी मेदगे हा या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार आहे. या कारवाईत पोलिसांनी इर्टीका कार रोख रक्कम, डायमंड खडे, गुन्ह्यात वापरलेली बनावट पिस्टल (लायटर पिस्टल), चाकू असा एकूण १० लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, रिझवान जिनेडे, हानिफ शेख, बाबा चव्हाण, पोलीस हवालदार अजय थोरात, श्रीकांत वाघवले, तुषार खडके, अमोल पवार, वैभव स्वामी, प्रकाश लोखंडे, अशोक माने, सुभाष पिंगळे, धनाजी पाटील, बशीर सय्यद, गजानन सोनुने, संजय बरकडे, अनिल घाडगे, इरफान शेख, उमेश काटे, विजयसिंह वसावे, प्रविण जाधव यांच्या पथकाने केली.