वाळूचा ट्रक ऑडी कारवर पलटल्याने कारमधील ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भरधाव वेगात जाणाऱ्या वाळूच्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ऑडी कारवर पलटला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर ४ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.१९) रात्री दिल्लीतील रोहिणी सेक्टर येथील केएन काडजू मार्गावर झाला.

कार चालक सुमित हे आई, पत्नी आणि मुलासह एका कार्यक्रमावरुन घरी जात होते. त्यांची कार ईएसआर रुग्णालयाजवळ आली असता भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रक वरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने ट्रक ऑडीकारव पलटी झाला. यामध्ये सुमित यांच्यासह पत्नी आणि आईचा मृत्यू झाला. तर त्यांचा ४ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमी मुलास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघातातील कार आणि ट्रक ताब्यात घेतला आहे. फरार ट्रक चालकांचा पोलिस शोध घेत आहेत.