गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनंतर अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- मोक्का, अपहरण, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने जेरबंद केले.अरविंद मारूती वाडकर (२८, रामनगर वारजे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

शहरातील पाहिजे असलेले व फरार असलेल्या  आरोपींचा शोध गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून सुरु होता. त्यावेळी खडक पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून पाहिजे असलेल्या  आरोपी अरविद वाडकर हा सेव्हन लव्हज चौकात येणार आहे. अशी माहिती पोलिस कर्मचारी अजय थोरात यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याल  सापळा रचून अटक केली. त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात अपहरण, बाललैंगिक अत्याचार, वारजे पोलिस ठाण्यात मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. तर वारजे पोलिसांकडून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनावर सुटला होता. मात्र कोर्टाच्या अटक वारंटमध्ये तो पोलिसांना पाहिजे होता. त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक दिनेश पाटील,  उत्तम बुदगुडे, अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, बाबा चव्हाण यांच्या पथकाने केली.