मनेका गांधींनी बिनबुडाचे आरोप थांबवावेत : शाफत अली खान

हैदराबाद : वृत्तसंस्था – मनेका गांधी माझ्या मुलावर बिनबुडाचे आरोप करत असून याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे. माझ्या मुलाने स्वत:च्या बचावासाठी वाघिणीवर गोळी झाडली. मात्र, खऱ्या परिस्थितीची माहिती नसताना एसीमध्ये निवांत बसून आरोप करणे चुकीचे आहे, असा टोला शाफत अली खान यांनी मनेका गांधी यांना लगावला आहे. अवनी वाघिनीची गोळी घालून हत्या करणारा शार्पशूटर अझहर अली यांचे शाफत अली खान हे वडिल आहेत.

शाफत अली खान म्हणाले, मी स्वत: एक शार्पशूटर आहे. काहीही माहिती नसताना लोक माझ्या मुलावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी माझ्या आयुष्यात एकाही प्राण्याची सरकारच्या आदेशाशिवाय हत्या केलेली नाही. माझ्याविरोधात पोलिसांनी एकही गुन्हा नोंदवलेला नाही. माझ्या मुलाने सुद्धा अवनीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न फसल्यानंतरच बचावासाठी गोळी झाडली. मात्र, मनेका गांधी कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करत आहेत. याद्दल मनेका गांधींना आम्ही कोर्टात खेचणार आहोत.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

२ नोव्हेंबररोजी टी १ मोहिमेअंतर्गत अवनी वाघिनीची हत्या करण्यात आली होती. या नरभक्षक वाघिणीच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अझहर अलीने यवतमाळमधील जंगलात वाघिणीला ठार केले होते. त्यानंतर देशभरातील प्राणीप्रेमींकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधींनी वाघिणीला बेकायदेशीररित्या मारण्यात आल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच शार्पशूटर अलीने वाघिणीला बेशुद्ध करणे शक्य असतानादेखील तिला ठार मारण्यात आल्याचे म्हटले होते.

बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळनी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र 

यावरून मनेका गांधी व मुनगंटीवार यांच्यातही सध्या जुंपली आहे. मनेका गांधी यांनीच राजीनामा द्यावा, असे धडाकेबाज प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही मुनगंटीवार यांना अभय दिले आहे. मी वनमंत्री मुनगंटीवार यांचा राजीनामा घेणार नाही, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मनेका गांधी यांना चपराक दिली आहे.