जरा हटके

तृणमूलचे खासदार बनले छडीवाले मोदी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘नागरिकता दुरुस्ती विधेयक २०१६’ मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षावर शाब्दिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी आपलीच हुकूमत गाजवत असतात असे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे मत आहे. त्यांच्या हुकुमतीला विरोध करण्यासाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले आहे. मोदी सरकारचा निषेद करण्यासाठी या सर्व खासदारांनी काळ्या रंगाची कपडे घातली होती. या खासदारांच्या हातात निषेदाचे फलक होते. तर एका खासदाराने हातात काठी तर चेहऱ्यावर मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटा परिधान केला होता. तृणमूल खासदारांच्या या अनोख्या आंदोलनामुळे संसद परिसरात सर्व माध्यमांचे लक्ष केंद्रित झाले होते.

तृणमूलच्या खासदारांनी नागरिकता दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. या विधेयकात नागरिकांच्या वास्तव्याचा काळ ११ वर्षावरुन ६ वर्षावर आणला आहे. तर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चनांना वैध दस्तावेजांव्यतिरिक्त भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

मोदी सरकारने आणलेले हे विधेयक म्हणजे मूळ नागरिकांच्या हक्कांवर आणि संस्कृतीवर संकट असल्याचे तृणमूलच्या खासदारांचे म्हणणे आहे. तृणमूल सहित अन्य चार विरोधी पक्षांच्या खासदारांनी आणि भाजपच्या काही मित्र पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.  काँग्रेस, टीएमसी, सीपीआय (एम), समाजवादी पार्टी या पक्षासहित भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या आसाम गण परिषद आणि शिवसेनेने या विधेयकाला विरोध केला आहे.

या विधेयका द्वारे समाजाची धार्मिक ओळख गडद केली जाणार असल्याचे विरोधी पक्षांच्या खासदारांचे मत आहे. या विधेयकाच्या दुरुस्तीसाठी धार्मिक आधार ठेवणे हे राज्यघटनेच्या कलम १४ च्या मूळ संकल्पनेलाच विरोध दर्शविणारे आहे असे विरोधी पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. तर राज्यघटनेचे कलम १४ हे भारतीय संघराज्याची समता अधोरेखित करणारे कलम आहे.  तृणमूल खासदारांनी मोदींचा मुखवटा घालून मोदींच्या मुखवट्या मागचा खरेपणा सर्वांसमोर आणण्याचा पर्यंत केला आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या