सुंदर बायकोसाठी त्यांनी केली आघोरी पूजा

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन 
कोणाची तरी आपल्यावर कृपा होईल आणि आपल्याला घरबसल्या श्रीमंत करुन टाकेल अशी सुप्त इच्छा बहुसंख्यांची असते. त्यामुळे जर एखाद्याने गुप्त धन मिळवून देतो, धनप्राप्ती करुन देतो, असे सांगितले की लोक चटकन त्याच्यावर विश्वास ठेवतात व स्वत:ला मांत्रिक म्हणवून घेणाऱ्यांच्या नादी लागतात. एकाने तर त्यावर कडी केली. आपल्याला सुंदर बायको मिळावी, यासाठी त्याने एका तांत्रिकाकडून चक्क पूजा करुन घेतली. मात्र तो वेळीच सावध झाला जेव्हा त्या तांत्रिक बाबाने पुढच्या पूजेसाठी नर बळीची मागणी केली. पोलिसांनी या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी अणणाऱ्यास अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a3bf65c-c21b-11e8-b450-555fc7b0f8b0′]

येथील बाबा गणपतीच्या मागे राहणारे अमोल सोनार यांच्या घरात हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला. पोलिसांनी अमोल सोनारसह तांत्रिक बाबा सुरुपसिंग महाराज यास अटक केली आहे.

भोकर : तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

याप्रकरणी परेश सोनार यांनी फिर्याद दिली आहे. अमोल सोनार व आणखी दोघांनी त्याला पूजेच्या ठिकाणी नेले. तेथे तांत्रिक बाबाने विवस्त्र अवस्थेत पूजा केली. मंतरलेले पाणी पिण्यास दिले. त्यानंतर धनप्राप्ती व इतर लाभासाठी यापुढच्या पूजेत नरबळी द्यावा लागेल, असे सांगितले. परेश सोनार घाबरलेल्या अवस्थेत तेथून निघाले. त्यांनी हा प्रकार घरी  सांगितला. कुटुंबियांनी त्याला पोलिसांकडे जाण्याच्या सल्ला दिला. त्यानुसार त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.