औद्योगिक परिसरातील उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्या सोडवाव्यात 

 पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

 

पिंपरी चिंचवड ,चाकण ,तळेगाव ,रांजणगाव या औद्योगिक परिसरातील उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्या बाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन निवेदन दिले असून त्या सोडविण्याची मागणी केली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d5a9ebc-ac22-11e8-9db4-cf0aa5ed799c’]

पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील भेट घेण्यात आली. यावेळी सचिव शजयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेजर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, विजय खळदकर, नितीन बनकर, संजय आहेर , शिवाजी साखरे, संजय सातव, नवनाथ वायाळ , हर्षल  थोरवे , प्रवीण लोंढे , प्रमोद राणे, दत्तात्रय दिवटे , भारत नरवडे , अतुल इनामदार , सुनील शिंदे , सचिन आदक, अशोक अगरवाल , सुरेश जपे , सागर शिंदे , निस्सार सुतार , चांगदेव कोलते , विजय भिलवडे , प्रभाकर धनोकार , अशोक पाटील, प्रदीप गायकवाड, मोहिनी जगताप उपस्थित होते .

पिंपरी चिंचवड सह चाकण ,तळेगाव  रांजणगाव  या औद्योगिक परिसरातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात समस्या व अडचणींना  सामोरे जावे लागत आहे .  पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज वाहक यंत्रणा  ३० ते ४० वर्षा जुने असून त्यामुळे या परिसरातील उद्योगांना खंडित वीज पुरवठा समस्येला सामोरे जावे लागत आहे . सध्या अस्तित्वात असलेले वीज दर कायम ठेवावे त्यात कोणत्याही प्रकारची वीज दर वाढ करू नये .कारण इतर राज्यांच्या तुलनेत हेच दर ३५ ते ४० % जास्त आहेत त्यामुळे अनेक मोठे उद्योग इतर राज्यात स्थलांतरीत होत आहेत सदर दराबाबत महाराष्ट्र वीज नियामक आयोग ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत निर्णय घेणार आहे .तरी त्या बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. पिंपरी चिंचवड MIDC परिसरात भुयारी गटार ,CETP PLANT व मैला शुद्धीकरण प्रकल्प राबवावा. चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक २ मधील डी ब्लॉक मध्ये २०१४ मध्ये जवळपास १० ते १५ उद्योजकांनी MIDC ने मंजूर केलेल्या जागेची  पूर्ण रक्कम भरली MIDC ने जागेचा ताबा देऊन करावयाचे बांधकामाचे नकाशे मंजूरही केले. परंतू , MIDC ने रस्ते ,पाणी मलनिस्सारण इ.सुविधा न पुरवल्यामुळे हे उद्योजक त्या जागेवर अद्याप उद्योग उभारू शकले नाहीत या सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक जागा MIDC ला देण्यास स्थनिक शेतकरी विरोध करत असून त्या मुळे उद्योग सुरु करू शकत नाही सर्व जागा ताब्यात नसताना भूखंड वितरण करण्याची घाई केल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

टेबल टेनिसमध्ये  अचंथा-मनिकाला कांस्यपदक

चाकण औद्योगिक परिसरात अरुंद रस्त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत  तरी रस्ते मोठे व रुंद करण्यात यावेत .पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात अंतर्गत भागात pmpml ला वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी ,जेने करून महिला कामगारांना कामावर जाण्या येण्यास सोयीचे होईल. पिंपरी चिंचवड ,चाकण या परिसरासाठी चाकण येथे विमान तळ होणे गरजेचे आहे शक्य असल्यास चाकण येथे विमान तळ करण्याबाबत फेर विचार व्हावा अथवा पुरंदर येथे होणारा नियोजित विमानतळास जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड ,चाकण ,तळेगाव रांजणगाव या औद्योगिक परिसरातून मोठे प्रशस्त रस्त्याची बांधणी करावी जेणे करून या औद्योगिक परिसरातून विमानतळाकडे  प्रवास जलद होईल.

किती घसरतो बाबा…थांब की आता

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील कुदळ वाडी येथील जवळ पास २८ उद्योगांवर कारवाई करून त्यांचे पाणी ,वीज पुरवठा तोडला आहे ,त्यांच्या मुळे नदी प्रदूषण होते असा मंडळाचा आरोप आहे त्यांना पुनर्प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी व रीतसर परवानगी मिळवण्यासाठी  किमान २ महिन्याची मुदत देण्यात यावी; आदी मागण्या आहेत.

या वेळी लवकरच उद्योगाशी संबंधित सर्व खात्याच्या मंत्री व अधिकारी यांची मुंबई येथे बैठक बोलवून उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या व मागण्या या कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येतील असे आश्वासन देसाई यांनी दिले असल्याचे बेलसरे यांनी  दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

जाहीरात