पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – मागील काही काळात सातत्याने इंधन दरात घट होत होती. आता मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उसळी खाल्ली आहे. आज पेट्रोलचे दर ४७ पैश्यांनी वाढले असून डिझेलच्या दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे.  सातत्याने होणाऱ्या इंधन दर वाढीने सामान्य माणसांच्या किशाला चांगलीच कात्री लावली होती अशात मधल्या काळात सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी दर कपात केली जात होती परंतु आता अचानक भडकलेल्या इंधन दरामुळे सर्व सामान्यांच्या आनंदनावर विरजन पडले आहे.

दिल्लीत हि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून दिल्लीत पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी भडकले आहे. म्हणून आता दिल्लीकरांना पेट्रोलसाठी ₹६९.७५ मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ₹६३.६९ रुपये मोजावे लागत आहेत.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केली जणारी दरवाढ हि सर्वत्र सारखी असून स्थानिक करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभर भिन्न असतात.

गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली पाहण्यास मिळत होती. मात्र आता  पेट्रोल आणि डिझेलच्या दराने अचानक उसळी मारल्याने सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आगामी काळात अशीच इंधन वाढ होईल का असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत ‘त्या’ महिलेचा इंडिया गेटसमोर गोंधळ 

मिथेनॉलयुक्त पेट्रोल बाजारात येताच पेट्रोल होणार ₹१० ने स्वस्त 

नीती आयोगाच्या देखरेखी मध्ये मोदी सरकार देशभरात १५ टक्के मिथेनॉल मिश्रित  पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे.या दृष्टीने संशोधकांच्या पुण्यात चाचण्याही सुरु झाल्या आहेत. भविष्यात हि मोदी  सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल कमीत कमी  १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशा पासून तयार केले जाते.  ऊसापासून तयार केलेले इथेनॉल सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये  मिसळले जाते . इथेनॉलसाठी प्रती लीटर ४२ रुपये खर्च येतो. तर मिथेनॉलसाठी फक्त २०  रुपये प्रती लीटर खर्च येतो. इथेनॉलपेक्षा  मिथेनॉल स्वस्त असल्याने या पर्यायाचा विचार केला जात आहे. त्याच प्रमाणे  मिथेनॉलमुळे प्रदूषण ही कमी होते . नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यामध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी घेण्यात आली आहे. त्याच प्रमाणे येत्या काही दिवसात मिथेनॉल मिश्रित  पेट्रोल वापरण्याच्या  निर्णयाला मंजुरी देण्यात येईल आणि मिथेनॉलचे उत्पादन घेऊन देशातील पेट्रोलचे दर घटवण्यास सरकारला यश येईल.