गाेळीबार करणाऱ्या फरार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

लोणी काळभोर : पाेलीसनामा ऑनलाईन- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या वापरीमाल सावलदास व नारायण मोबाईल दुकानासमोर मंगळवारी (ता.१३ ) गावठी कट्ट्यातून गोळीबार करून दोन सराईत गुन्हेगार फरार झाले होते. या सराईत गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी उरुळी कांचन परीसारतील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून शनिवारी (ता.१७ ) निषेध व्यक्त केला. या निषेधार्थ येथील सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन पाठिंबा दिला.

दहशत निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्याच्या दुकानावर गोळीबार करून दोन गुन्हेगार फरार झाले होते. ऋषभ रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी व खंडणी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र हे गुन्हेगार अद्याप फरारी असल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सराईत कलवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी उरुळी कांचन परीसारतील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला.