ताज्या बातम्या

वायू गळतीमुळे गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई गोवा महामार्गावर घारपाडा फाटा याठिकाणी रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यानंतर या टँकरमधून वायूची गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आह. या महामार्गावर प्रचंड कोंडी झाली असून शनिवारी देखील ही कायम आहे.

वाहतुक पोलिस, अग्निशमन दल घटनास्थाळी दाखल असुन  गळती थांबविण्यात आली आहे. या अपघातामुळे दोन्ही मार्गावर सुमारे ६ किमीपर्यत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या या टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व हा टँकर महामार्ग सोडून कडेला गेला. त्यामुळे त्यांची मागील बाजू आणि मुख्य केबिन मधील संपर्क तुटला व टँकरच्या मागचा भाग निसटला. त्यामुळे टँकरची टाकी मागच्या बाजूने खाली येऊन जमिनीवर धडकली. त्यातून गळती सुरु झाली. सावधानतेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबविण्यात आली.

अग्निशामक दलाने पाणी मारुन या गळतीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आत गळती थांबविण्यात यश आले आहे. जवळपास ८ तासानंतर एका बाजूची वाहतूक सुरु करण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या