अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांची बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांची आज (गुरूवारी) सायंकाळी बदली केली आहे. गेल्या आठवडयात राज्य गृह विभागाने पोलीस उपायुक्‍त, सहाय्यक पोलीस आयुक्‍त तसेच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या.
कुलवंत कुमार सारंगल हे सध्या अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हणून विक्रीकर विभागात मुंबई येथे कार्यरत होते. त्यांची आज बदली करण्यात आली असुन त्यांची नियुक्‍ती आता पोलीस महासंचालक कार्यालयात अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) येथे करण्यात आली आहे. त्यांच्या बदली बाबतचे आदेश राज्य गृह विभागाने गुरूवारी सायंकाळी जारी केले आहेत. सारंगल यांनी यापुर्वी नाशिक येथे पोलीस आयुक्‍त म्हूणन देखील कर्तव्य बजाविलेले आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांना पोलिस दलामध्ये ओळखले जाते. अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) हे पद रिक्‍त झाल्यानंतर सारंगल यांनी त्या पदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे.
जाहिरात