जिल्ह्यातील ५ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या ‘त्या’ अधिकाऱ्याला अकार्यकारी नियुक्तीचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज रात्री जिल्ह्यातील 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यात एमआयडीसी व कँप पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांचा समावेश आहे. तसेच तोफखाना, अकोले व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली परिक्षेत्रात नाशिक ग्रामीणला झाली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची बदली यांच्याविरुद्ध पुणे शहरात अपसंपदेचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त करा, असा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे. या बदल्यांमुळे दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आज बदलले, तर चार पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तातडीने बदलले जाणार आहेत.

नाशिक परिक्षेत्रीय बदल्यात विशेष पोलिस महानिरीक्षकांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांतील तोफखाना पोलिस ठाण्याचे संपत शिंदे, बेलवंडीचे राजेंद्र पडवळ व अकोलेचे प्रमोद वाघ या तीनही अधिकार्‍यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद चव्हाण व कँप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील या दोघांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून शिर्डी पोलिस ठाण्याचे मोहन बोरसे व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून शंकरसिंग राजपूत यांची बदली झाली आहे. ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती होते.

इतर अधिकार्‍यांच्या बदल्या:-
अधिकाऱ्यांची नावे- नवीन नियुक्तीचे ठिकाण: सहाय्यक निरीक्षक तेजश्री सातपुते- नियंत्रण कक्ष, योगेश देशमुख- जिल्हा वाहतूक, श्रीरामपूर विभाग, उपनिरीक्षक मोहन भोसले- वाचक, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक, सुनील सूर्यवंशी- नियंत्रण कक्ष, शिवाजी नागवे- श्रीरामपूर शहर, राजेंद्र पवार- लोणी, नामदेव सहारे- एमआयडीसी, संजय कवडे- संगमनेर शहर, सिद्धेश्‍वर गोरे- जामखेड, भालचंद्र शिंदे- एमआयडीसी, अमोल गंगलवाड- शिर्डी शहर वाहतूक.

४ जिल्ह्यातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
५ जिल्ह्यातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
बीड जिल्यातील ९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (API) बदल्या