७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह १ उपनिरीक्षकाची बदली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पुणे आयुक्तलयातील जादा अधिकारी पिंपरी-चिंचवडला असल्याने यावर बऱ्याचदा वादंग पेटले होते. काही दिवसांपूर्वी तर यांना अनाधिकृत असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशी एकूण आठ अधिका-यांची पुणे पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर पुणे येथून पिंपरी चिंचवड येथे बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे आयुक्तालयात बदली झालेले अधिकारी आणि पोलीस ठाणे –

सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल सिद्राप्पा न्यामणे (हिंजवडी), सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका दामोदर सरग (सांगवी), सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जयसिंग धामणे (हिंजवडी), सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दत्ता वाघमारे (पिंपरी), सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ महादेव बनसोडे (निगडी), सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी (चाकण), सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू रामचंद्र ठुबल (एमआयडीसी भोसरी), पोलीस उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले (हिंजवडी). या अधिकाऱ्याची बदली प्रशासकीय कारण दाखवत पुणे आयुक्तालयात करण्यात आली आहे.