खुशखबर…! ‘या’ तारखे पासुन होणार रेल्वे प्रवास स्वस्त 

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या १५ तारखेपासून देशभरातील रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या फ्लेक्सी फेयर स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यासारख्या प्रीमिअम एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होतील. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर काही एक्स्प्रेस गाड्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली होती. फ्लेक्सी फेयर स्कीममुळे आरक्षित होणाऱ्या तिकीटांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे दरही वाढतात.

मात्र, ही स्कीम रद्द झाल्याने तिकीटांचे दर स्थिर राहतील. ज्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिन्याला ५० टक्के आसने भरतात त्या गाड्यांमधून सहा महिन्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली जाईल. तर ज्या गाड्यांमधील ५० ते ७५ टक्के आसने भरतात त्या ठिकाणी ऑफ सिझनमध्ये फ्लेक्सीरेल्वेच्या फेयर स्कीम नसेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तर सोबतच वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याच वर्षी आगामी लोकसभा निवडणुका होणार असून त्यामध्ये वाय-फाय सुविधा उद्दिष्टपूर्तीचा मुद्दा भाजपाकडून प्रचारात वापरला जाण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंग, आधार कार्ड तयार करणे, सरकारी प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाइनद्वारे मिळविणे, करभरणा, बिले भरणे या सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर जनतेकडून व्हावा असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

2019
च्या मार्चपर्यंत देशातील सर्व म्हणजे सुमारे ८५०० स्थानकांत ही सेवा उपलब्ध करून देण्याचे रेल्वे खात्याने ठरविले आहे.
216 महत्त्वाच्या स्टेशन्सवर सध्या मोफत वायफायची सुविधा दिली जाते. त्याची सेवा जवळपास ७० लाख प्रवासी घेत आहेत.
देशातील सर्व म्हणजे ८५०० रेल्वे स्थानकांवर
वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याच वर्षी आगामी लोकसभा निवडणुका होणार असून त्यामध्ये वाय-फाय सुविधा उद्दिष्टपूर्तीचा मुद्दा भाजपाकडून प्रचारात वापरला जाण्याची शक्यता आहे.
डिजिटल इंडिया हा उपक्रम मोदी सरकारने कसा यशस्वीरीत्या राबविला हे दाखविण्यासाठी रेल्वे स्टेशनांतील वाय-फाय सुविधा उपलब्धतेच्या मुद्दा भाजपाकडून जोरकसपणे सांगितला जाऊ शकतो.
ग्रामीण भागातही सेवा-
ग्रामीण व दुर्गम भागातील रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक जनतेला त्याचा वापर करता येईल.
त्याचप्रमाणे या भागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकातील ‘वाय-फाय’ सेवेचा वापर करून इ-कॉमर्स पोर्टलवरून अनेक वस्तूंची खरेदी करणेही सुलभ होईल.