ताज्या बातम्या

मॅट कोर्टाकडून ‘त्या’ पोलिसांना दिलासा

पुणे : पोलीसनामा  ऑनलाइन  – पदोन्नतीनंतर वाढलेले वेतन सेवानिवृत्तीच्या वेळी पोलिस कर्मचार्‍यांच्या देय रकमेतून कापून घेतल्याप्रकरणी मॅट कोर्टाने गृहखात्याला दणका दिला आहे. या कर्मचार्‍यांच्या वेतनातून कापून घेतलेली रक्कम संबधित कर्मचार्‍यांना परत द्यावी, असे आदेश मॅट कोर्टाने पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

शहर पोलिस दलातील सहाय्यक फौजदार विकास अत्रे आणि प्रविण मोरे हे अनुक्रमे २०१५ आणि २०१३ मध्ये पोलिस दलातून निवृत्त झाले. हे दोघेही १९८६ मध्ये शहर पोलिस दलामध्ये पोलिस शिपाई म्हणून भरती झाले होते. सेवाकालावधीतत्यांची पोलिस नाईक, हवालदार आणि सहाय्यक फौजदार पदापर्यंत पदोन्नती झाली होती.

परंतू ज्यावेळी ते सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांना प्रत्येक पदोन्नतीमुळे मिळालेले अधिकचे वेतन कापून घेवून त्यांची इतर ग्रॅच्युईटी, पेन्शन व अन्य देणी देण्यात आली. अत्रे यांचे ९२ हजार ८१२ रुपये तर मोरे यांचे ३ लाख ५९ हजार १७२ रुपये कापून घेण्यात आले आहेत. या विरोधात अत्रे आणि मोरे यांनी ऍड. व्हि.व्हि. जोशी यांच्या मार्फत मॅट कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. मॅट कोर्टाने नुकतेच याप्रकरणी निकाल देत अत्रे आणि मोरे यांची कापून घेतलेली रक्कम त्यांना परत द्यावी, असे आदेश दिले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या