राजकीय

ट्रम्प तात्या पत्रकार परिषदेतच पत्रकारावर भडकले

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एका पत्रकारामध्ये व्हाईट हाऊसमध्येच बाचाबाची झाली. अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांचा निकाल  जाहिर झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीएनएनच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरुन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले. या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर थोड्या वेळाने मात्र ट्रम्प यांनी संबंधित पत्रकाराला चांगलेच धारेवर धरले. या पत्रकाराला उद्धट आणि निर्लज्ज म्हणत त्यांनी सीएनएन वाहिनीवरही तोंडसुख घेतले.

सीएनएन वृत्तवाहिनीचे पत्रकार जिम अकोस्टा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वारंवार ट्रम्प यांना अमेरिकन निवडणूकीतील रशियन हस्तक्षेपाविषयी प्रश्न विचारला. यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी सुरक्षरक्षकांना पत्रकाराचा माईक काढून घेण्याचे आदेश दिले. तरीही या पत्रकाराने रशियन प्रकरण लावून धरल्याने अखेर ट्रम्प यांनी रशियाचा हस्तक्षेप प्रकरण हा माझ्याविरुद्धचा खोटा बनाव असल्याचे उत्तर दिले. अशा बनावांना मी भीक घालत नाही असे म्हटले.

‘नोटा’ने नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नको : अण्णा हजारे 

यानंतर मात्र ट्रम्प पत्रकारावर चांगलेच घसरले. या पत्रकाराला उद्धट आणि निलाजरा म्हणत त्यांनी सीएनएन वाहिनीवरही तोंडसुख घेतले. सीएनएनसारख्या वृत्तवाहिन्या खोट्या बातम्या पसरवण्यात आघाडीवर आहेत. या अशा बनावट वृत्तवाहिन्या व पत्रकारच देशाचे खरे शत्रू आहेत, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी एनबीसी न्यूजचे पत्रकार पीटर अलेक्झांडर यांनी अकोस्टा यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पारा चढलेल्या ट्रम्प यांनी अलेक्झांडर यांनाही सोडले नाही. पत्रकार असल्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत ट्रम्प या पत्रकारावरही घसरले. या घटनेमुळे ट्रम्प प्रशासन व अमेरिकन माध्यमे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 4 =