आश्चर्यजनक… मनात विचार करण्याने बदलणार टीव्हीचा चॅनल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – आता चक्क तुम्ही डोक्यात विचार कराल आणि समोर टीव्हीचा चॅनेल बदलेल असे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मोबाईलही आता स्मार्टफोन झाले आहेत आणि दिवसेंदिवस ते अधिकच स्मार्ट होत आहेत. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना आता टीव्ही क्षेत्रातही वेगवेगळे तंत्रज्ञान येताना दिसत आहे. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. आता टीव्हीचा चॅनेल बदलण्यासाठी कोणत्याही रिमोट कंट्रोलची आवशकता पडणार नाही. लवकरच तो कालबाह्य होणार आहे. कारण सॅमसंग एक असा टीव्ही बनवित आहे जो मनात विचार जरी आला तरीही चॅनल बदलणार आहे. म्हणजेच रिमोट कंट्रोलची गरज उरणार नाही.

दारू पिऊन तरुणीचा विमानातच धिंगाणा 

सॅमसंगने एक नवीन प्रोजेक्ट लाँच केला आहे. सदर तंत्ररज्ञान सॅमसंग विकसित करत आहे. यासाठी सॅमसंगने स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL) च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे. सॅमसंग विकसित करत असलेल्या या प्रोजेक्टला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’ असे नाव देण्यात आले आहे.
हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजावून घेत आहेत. शिवाय डोक्यातून निघणाऱ्या लहरींनाही समजण्याचा प्रयत्न करत आहेत. टीव्ही पाहताना व्यक्ती काय विचार करतात आणि कसे कार्य करतात याचाही अभ्यास केला जात आहे. सॅमसंग या प्रोजेक्टवर गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहे. पुढील वर्षी असा अनोखा स्मार्ट टीव्ही प्रायोगिक तत्वावर येणार आहे. या तंत्रज्ञानानुसार केवळ विचार केल्याकेल्याच चॅनल बदलणार आहे. एवढेच नाही तर टीव्हीटा आवाजही कमी-जास्त करता येणार आहे.